अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ निवडणुकीत नागपूर युनिअन टीचर्स असोसिएशन अर्थात ‘नुटा’चे वर्चस्व कायम राहिले आहे. अमरावती विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणीसाठी 22 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली. 63 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. बुधवार , 23 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. यात 39 सदस्य विजय झाले, जे नुटाशी संबंधित आहेत. अकोल्याचे अॅड. मोतीसिंह मोहता हे देखील निवडणुकीत विजयी झाले आहेत.
विद्यापीठ सिनेट अर्थात अधिसभेसाठी दहा प्राचार्य मतदारसंघातून अनुसूचित जाती वर्गवारीत एका जागेसाठी डॉ. सुभाष गवई यांना 65, डॉ. राजेंद्र रामटेके यांना 49 मते मिळाली. डीटी/एनटी वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉ. राजेश चंदनपाट यांना 40, डॉ. विजय नागरे यांना 74 मते मिळाली. ओबीसी वर्गवारीतून एका जागेसाठी डॉ. उध्दव जाणे यांना 43, डॉ. अंबादास कुलट यांना 73 मते मिळाली. महिला वर्गवारीतून एका जागेसाठी डॉ. मिनल ठाकरे यांना 51, डॉ. आराधना वैद्य यांना 64 मते मिळाली. सर्वसाधारण वर्गवारीत पाच जागांसाठी डॉ. राधेश्याम सिकची, डॉ. देवेंद्र गावंडे, डॉ. सुनिल पांडे, डॉ. संजय खेरडे व डॉ. निलेश गावंडे विजयी झालेत.
सहा व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघाच्या महिला वर्गवारीत एका जागेसाठी डॉ. मिनल गावंडे यांना 133, डॉ. विरा मांडवकर यांना 78 मते मिळाली. सर्वसाधारण वर्गवारीत 4 जागांसाठी हर्षवर्धन देशमुख, डॉ. अशोक चव्हाण, राम देवसरकर व अॅड. मोतीसिंह मोहता विजयी झालेत.
महाविद्यालयीन दहा शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून डॉ. प्रफुल्ल गवई यांना 1006, डॉ. रविंद्र मुंद्रे यांना 1581, डॉ. प्रकाश पानतावणे यांना 318 मते मिळाली. अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रा. हरीदास धुर्वे यांना 1868, प्रा. प्रसाद मडावी यांना 1011 मते मिळाली. डीटी/एनटी वर्गवारीतून प्रा. नीता गिरी यांना 1113, प्रा. विजय कापसे यांना 1833 मते मिळाली. ओबीसी वर्गवारीतून डॉ. सुभाष गावंडे यांना 1828, डॉ. प्रदीप खेडकर यांना 1087 मते मिळाली. महिला वर्गवारीतून एका जागेसाठी डॉ. अर्चना बोबडे यांना 2029, डॉ. रेखा मग्गीरवार यांना 930 मते मिळाली. डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. संतोष बनसोड, डॉ. संतोष कुंटे, डॉ. प्रशांत विघे व डॉ. सावन देशमुख हे विजयी झालेत.
तीन विद्यापीठ शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी महिला वर्गवारीतून जागृती बारब्दे यांना 35, वैशाली धनविजय यांना 22 मते मिळाली. सर्वसाधारण वर्गवारीतून एका जागेसाठी डॉ. अनिल नाईक यांना 24, डॉ. संदीप वाघुळे यांना 33 मते मिळाली.
दहा नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून महिला वर्गवारीतील एका जागेसाठी अनुराधा जळीत यांना 4434, मयुरी जवंजाळ यांना 5785 मते मिळाली. पदवीधर मतदार संघामध्ये एस.सी. वर्गवारीत प्रताप अभ्यंकर (4346) मताने निवडून आलेत. एस.टी. वर्गवारीत रितेश खुलसाम(5130) मताने निवडून आलेत. डीटी/एन टी वर्गवारीत कैलाश चव्हाण (4731) मताने निवडून आलेत.
अभ्यास मंडळाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत संलग्नित महाविद्यालयातील गणित मंडळ निवडणुकीत डॉ. विजय मेटे, डॉ. अनिल निमकर व डॉ. विद्या शर्मा, भौतिकशास्त्र मंडळात डॉ. गोपाल ढोकणे, डॉ. अजय लाड व डॉ. संजयकुमार शामकुंवर विजयी झालेत. रसायनशास्त्र अभ्यास मंडळात डॉ. सुमरसिंह ठाकूर, डॉ. हेमंतकुमार चांडक व डॉ. प्रवीण रघुवंशी निवडून आलेत. वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. दिलीप हांडे, डॉ. सुचिता खोडके व डॉ. तुषार वानखडे यांनी विजय मिळवला. विज्ञान (इंग्रजी व भारतीय भाषा) अभ्यास मंडळावर डॉ. अभिजित अणे, डॉ. विजय जाधव व डॉ. अविनाश थोटे ज्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळावर डॉ. चंद्रकांत जाधव, डॉ. अजय ठाकरे व डॉ. मनिष तिबडेवाल निवडून आलेत. फार्मास्युटीकल सायन्स अभ्यास मंडळावर डॉ. अनिल चांदेवार, डॉ. सचिन दिघडे व डॉ. शिरिष जैन निवडल्या गेलेत.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत लेखा व सांख्यिकी अभ्यास मंडळावर डॉ. मनोजकुमार जगताप, डॉ. मनोज पिंपळे व डॉ. सोनल चांडक यांना यश मिळाले. व्यवसाय व्यवस्थापन अभ्यास मंडळावर डॉ. रुपेश कुहेकर, डॉ. आनंद नारंजे व डॉ. प्रसाद खानझोडे यांचा निवडणुकीत विजय झाला. वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर डॉ. श्रीकृष्ण काकडे, डॉ. ताराचंद कंटाळे व डॉ. सुभाष राऊत निवडून आलेत. मानवविज्ञान विद्याशाखेअंतर्गत इंग्रजी अभ्यास मंडळावर डॉ. राजेश मस्के, डॉ. सुधीर त्रिकांडे व डॉ. किरण खंडारे निवडून आलेत. मराठी अभ्यास मंडळावर डॉ. काशिनाथ बराटे, डॉ. गजानन मुंढे व डॉ. अण्णा वैद्य यांनी विजय मिळवला. इतिहास अभ्यास मंडळावर डॉ. संतोष बनसोड, डॉ. गोविंद तिरमनवार व डॉ. कैलास गायकवाड निवडून आलेत. अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. रामदास भांडवळकर, डॉ. मधुकर ताकतोडे डॉ.एस.एम. दंडाडे यांनी यश संपादन केलं. राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. प्रशांत विघे, डॉ. प्यारेलाल सूर्यवंशी व डॉ. सुभाष गवई विजयी झालेत. होम इकॉनॉमिक्स अभ्यास मंडळावर डॉ. संध्या काळे, डॉ. कल्पना कोरडे व डॉ. निना चावरे निवडून आल्यात.
विद्या परिषदेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील सर्वसाधारण वर्गवारीतून एका जागेसाठी डॉ. संजीव जगताप यांना 1715, डॉ. दिनेश खेडकर यांना 1175 मते मिळाली. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील अनुसूचित जाती वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉ. वर्षा सुखदेवे यांना 2005, डॉ. अरुणा वाडेकर यांना 1025 मते मिळाली. सर्वसाधारण वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉ. ए.जी. हरणे यांना 1215, डॉ. एम.एम. पिंपळे यांना 1669 मते मिळाली. मानवविज्ञान विद्याशाखेतील डी.टी. / एन.टी. वर्गवारीत डॉ. अरुण चव्हाण यांना 1339, डॉ. जीवन पवार यांना 1500 मते मिळाली. सर्वसाधारण वर्गवारीतून डॉ. सुनिल आखरे यांना 1244, डॉ. नितीन चांगोले यांना 1653 मते मिळाली. आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील ओबीसी वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉ. एस.व्ही. देशमुख व डॉ. संजीव साळीवकर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामधून डॉ.एस.व्ही. देशमुख यांचा विजय झाला.
मतमोजणीच्या कामासाठी शिक्षण विभागप्रमुख डॉ. गजानन गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले होते. त्या समितीत बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगांवकर, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. यादवकुमार मावळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रणव कोलते, केमिकल टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ.ए.एल. राठोड यांचा समावेश होता. निर्वाचन अधिकारी म्हणून कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी कार्य केले. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांचे मार्गदर्शन मतमोजणीच्या कामासाठी लाभले. निवडणूक कक्षाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, सहाय्यक कुलसचिव रवींद्र सयाम, प्रभारी अधीक्षक उमेश लांडगे आदींनी मतमोजणीच्या कामामध्ये सहभाग नोंदविला.