अमरावती : संशयास्पद स्थिती बडनेरा रेल्वे स्थानकावर फिरणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या जवळुन १२ किलो गांजा जप्त केला. लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली.
११ जानेवारी २०२३ रोजी रात्री उशिरा पोलिस उपनिरीक्षक पंकज शर्मा, निळकंठ बंडे यांना शेख मुस्ताक शेख कबरूद्दीन हा फलाटावर फिरताना आढळला. संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याजवळील साहित्य जप्त केले. मुस्ताक जवळ असलेल्या पिशव्यांमध्ये पोलिसांना गांजा आढळुन आला. या गांजाची किंमत १ लाख २५ हजार रुपये आहे. मुस्ताक हा रायपूर येथुन बडनेरा येथे आला होता. हा गांजा तो कुणाला विकणार होता, याचा पोलिस शोध घेत आहे.