Ram Mandir News : फक्त रामभक्तांनाच निमंत्रण; आचार्य सत्येंद्रदास यांची माहिती
Ayodhya | अयोध्या : अयोध्या राममंदीर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण फक्त रामभक्तांनाच देण्यात आले आहे, असे राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्रदास म्हणाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नाही, यासंदर्भात आचार्य सत्येंद्रदास यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले निमंत्रणाबाबत राजकारण करण्यात येत असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. (Acharya Satyendra Said That Invitation Of Ayodhya Ram Mandir Ceremony is Given Only To Ram Bhakta)
रामाचे भक्त असलेल्यांनाच निमंत्रण देण्यात आले असल्याचे स्पष्ट करत सत्येंद्रदास यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी रामाच्या नावावर निवडणूक लढत आहे. देशात पंतप्रधानांचा सन्मान केला जातो. त्यांनी खूप मोठे काम केले आहे. कुठलेही राजकारण केलेले नाही. ही त्यांची रामभक्ती आहे असे आचार्य सत्येंद्रदास यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांना भयंकर त्रास होत आहे, पण तो सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. हे तेच लोकं आहेत ज्यांनी रामाच्या नावावर मते मागितली, परंतु आता फालतू विधाने करत आहेत तसेच प्रभू रामचंद्रांचा अपमान करत आहेत.