Home » भंडाऱ्यात तलवारीने कापला केक

भंडाऱ्यात तलवारीने कापला केक

by नवस्वराज
0 comment

भंडारा : भंडारा जिल्ह्यात वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याची घटना घडली. सध्या या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भंडारा पोलिस तलवारीने केक कापणाऱ्यांचा शोध घेत आहे.

भंडारा शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कुंतल नामक २२ वर्षीय तरुणाने स्वतःचा वाढविवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी त्याने टेबलवर ठेवलेले दहा केक हातात तलवार घेवून कापले. हा वाढदिवसाचा कार्यक्रम भंडाऱ्या जवळील गणेशपूर इथे गुरुवारी रात्री झाला. यावेळी त्याच्यासह त्याच्या मित्रांनी वाद्याच्या तालावर ठेका धरत तलवारीने केक कापले. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थितांनी तलवारीने केक कापण्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला. आता हाच व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यापूर्वी २९ मे रोजी मोहाडी तालुक्यातील रोहा या गावात अशाच प्रकारे तलवारीनं केक कापला होता. त्यावर कारवाई करताना पोलिसांनी तलवार जप्त केली होती. आता या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलिस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यापूर्वी ७ जानेवारी २०२२ रोजी भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे कांदिवली येथील तरुणांच्या चांगलेच अंगलट आले होते. या वाढदिवस सोहळ्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच कांदिवली पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार हस्तगत करण्यात आली होती

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!