Akola | अकोला : अकोला रेल्वेस्थानकावर एका १५ वर्षीय मुलीने उडी मारल्याने खळबळ उडाली. अशातच कर्तव्यावर असलेले ‘आरपीएफ’चे पोलीस निरीक्षक युसूफ खान यांनी प्रसंगावधान राखत उडी मारून मुलीचा जीव वाचवला. उडी मारल्यानंतर या मुलीचा तोल गेला होता.
अकोला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर आलेल्या पुरी-ओखा सुपरफास्ट एक्सप्रेसमधील आरक्षित डब्यातून कोमल कोळी (वय 15) हिने गाडी सुरू झाल्यावर फलाटावर उडी मारली. मुलीचा तोल जाऊन ती खाली पडली. कोमल धावत्या रेल्वेच्या बोगीखाली जाण्याची शक्यता होती. अशातच रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक युसूफ खान व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी उडी मारून मुलीला बाजूला केले .त्यामुळे मुलीचा जीव वाचला.