Home » Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा राजीनामा काँग्रेसला मोठा झटका

Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा राजीनामा काँग्रेसला मोठा झटका

Gulamnabi Azad : काँग्रेस पार्टीसाठी हा मोठा झटका आहे

by नवस्वराज
0 comment

Mumbai : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे. डेमोक्रॅटीक प्रगतशील आझाद पार्टीचे ( DPAP) अध्यक्ष गुलाम नबी आजाद यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,  काँग्रेस पार्टीसाठी हा मोठा झटका आहे. चव्हाण यांचा महाराष्ट्रातील एक क्षेत्रात चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडणे पार्टीसाठी मोठी हानी आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता डीपीएपीचे अध्यक्ष गुलाम नबी आजाद यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी काँग्रेस सोडली आहे. त्यांचे वडील देखील एकेकाळी मुख्यमंत्री होते. त्यांचा खुप मोठा परिवार आहे, कायम काँग्रेसशी जोडलेला होता. पक्षात आणि एका क्षेत्रात दबदबा असलेले अशोक चव्हाण हे एकमेव मोठे नेता होते. त्यांच्या पक्षत्यागाने काँग्रेस त्या क्षेत्रात संपली आहे, असे आझाद यांनी म्हटले आहे. मी काँग्रेस सोडल्यामुळे जास्त बोलणार नाही, असेही ते म्हणाले.

कॉंग्रेसचे माजी नेता आजाद म्हणाले की, येत्या काही दिवसात अजून काही लोक काँग्रेस सोडतील असे वाचण्यात येते. मी राजकीय कारकीर्दीची सुरुवात महाराष्ट्रातून केली. अनेक वर्ष महाराष्ट्रातून खासदार म्हणून निवडून आलो. दहा वर्ष लोकसभा आणि नंतर राज्यसभेचा सदस्य होतो असे आझाद यांनी सांगितले. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जेथे काँग्रेस तग धरू शकत होती. परंतु आता प्रभावशाली नेत्याचा पक्षत्यागाने तेथे पक्षाला मोठा झटका बसला आहे. अनेक राज्यात काँग्रेस संपली आहे असेही गुलामनबी आझाद म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!