Home » Kajal Hindustani : अकोला येथे हिंदू वीर-वीरांगना संमेलन

Kajal Hindustani : अकोला येथे हिंदू वीर-वीरांगना संमेलन

Sakal Hindu Samaj : सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर उद्बोधन करणार

by नवस्वराज
0 comment

Akola : 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकल हिंदू समाजातर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात सायंकाळी 05.30 वाजता हिंदू वीर-वीरांगना संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात राष्ट्रीय ख्यातिप्राप्त प्रवक्ता काजल हिंदूस्तानी (गुजरात) या सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर उद्बोधन करणार आहेत.

संमेलनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत महिला, विद्यालय, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्गाचे विद्यार्थी, मठ व मंदिर प्रमुख, गणेश, पालखी मंडळांचे तसेच हिंदू संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, उपस्थित होते. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 04.30 वाजता श्री राजराजेश्वर मंदिर ते खुले नाट्यगृहापर्यंत भव्य मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, यात मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार आहेत. यानंतर होणाऱ्या उद्बोधन कार्यक्रमाला नागरीकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी भरत मिश्रा, अंबरिश शुक्ला, उमेश लख्खन, प्रविण अग्रवाल, नवल टावरी, अमर तिवारी, हरिदास ठाकरे, आकाश सावते, स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, प्रतीक रंधे, मयूर गुजर, विकास राठोड, संतोष यादव, राजेश शर्मा, संतोष अग्रवाल, शंकर शर्मा, सूरज भगेवार, सूरज जयस्वाल, प्रताप विरवानी, पंकज टावरी, विनोद जुनारे, विमल जैन, मयूर मिश्रा, तुषार गोतमारे, श्रीकांत इंदोरिया, राजू मंजूलकर, कल्पेश खंडेलवाल, गोविंद शर्मा, धीरज खापर्डे, अॅड. ममता तिवारी, अर्चना शर्मा, राजश्री शर्मा, सुमन गावंडे, दीपीका ठाकूर, भाविका मिश्रा, हिना शाह, शैला पाटील, शिला कुरमी, ममता पसारी, दीपा शुक्ला, मयुरी निकम, सरला शर्मा, ललिता वर्मा, अॅड. स्नेहल सांवल, निशा टावरी, मंगला पराळकर, चित्रा बापट, रेखा शर्मा, पुष्पा शर्मा, रेखा नालट, आरती पनपालीया, अनन्या तिवारी आदी परिश्रम घेत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!