Home » IB Raid : काश्मीरच्या त्या ट्रकमुळे यवतमाळ पोलीसांची धावपळ

IB Raid : काश्मीरच्या त्या ट्रकमुळे यवतमाळ पोलीसांची धावपळ

Police Action : दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचा संशय

by नवस्वराज
0 comment

Yavatmal : 22 जानेवारी रोजी आयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम साजरा होत असल्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अशातच गुरुवारी आयबीच्या (IB) सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे यवतमाळ पोलिसांची भयंकर धावपळ उडाली. काश्मीरहून निघालेल्या एका ट्रक बाबतची माहिती आयबीने यवतमाळ पोलिसांना दिली. हा ट्रक हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून तेलंगणाकडे जात होता. यवतमाळ पोलिसांनी द्रुत गतीने हालचाल करून महाराष्ट्र -तेलंगणाची सीमा ओलांडण्याआधी हा ट्रक अडविण्यात यश मिळवले.

आयबीच्या इशाऱ्यामुळे या ट्रकमध्ये दहशतवादी कारवायांसाठीचे सामान असावे किंवा दहशतवादी असावेत, असा संशय निर्माण झाला होता. या ट्रकबाबत संशय येण्याचे कारण असे की, या ट्रकचा वापर काश्मीर ते आयोध्या दरम्यान माल वाहतुकीसाठी अनेकदा करण्यात आला होता. त्यामुळे आयबी अधिकाऱ्यांना या ट्रकबाबत संशय होता. श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची गडबड सुरू असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे.

ट्रक पांढरकवडा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तेथे आयबी पथकही दाखल झाले. ट्रकमधून दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. ट्रकची देखील बारकाईने तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये फ्रूट ज्यूसच्या बाटल्या आढळून आल्या. चौकशीनंतर ट्रक तसेच ट्रक मधील व्यक्तींमुळे कुठलाही धोका नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!