Home » Mumbai News : मालदिवने मागितली अखेर माफी

Mumbai News : मालदिवने मागितली अखेर माफी

by नवस्वराज
0 comment

Mumbai | मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांवर वर्णद्वेषी टीका मालदिवच्या काही मंत्र्यांनी केली आहे. त्यानंतर भारतीय नागरिक, कलावंत आणि खेळाडूंनी सामाजिक माध्यमावर संताप व्यक्त केला. भारतीय नागरिकांकडून मालदिववर बहिष्कार घालण्याचे तसेच पर्यटनासाठी मालदिवला न जाण्याचे आवाहन केले जात आहे. अनेक भारतीयांनी त्यांची मालदिव ट्रिप रद्द केली. भारतातील काही आंतरराष्ट्रीय प्रवास कंपन्यांनी देखील मालदिवसाठीचे बुकिंग रद्द केले. नवीन बुकिंग घेणे बंद केले. (After Criticism On Narendra Modi Maldives Minister Maldive Apologize)

 

मालदिवच्या मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे मालदिवच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार असल्याचे दिसू लागले आहे. मालदिवच्या पर्यटन उद्योगात भारताचे मोठे योगदान आहे. भारत मालदिवसाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून कायम आहे. कोरोना काळात भारताने मालदिवला कोरोना लसीचा नि:शुल्क पुरवठा केला होता. भारत नेहमी मालदिवच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. उभय राष्ट्रातील घनिष्ठ मैत्रीचे संबंध यापुढेही कायम राहावे म्हणून मालदिवच्या पर्यटन विभागाने,मालदिव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्रिजने (MATI) निवेदन जारी करत भारताची माफी मागितली आहे. त्यांच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविला आहे. अडचणीच्या काळात भारत आमच्या मदतीसाठी नेहमीच उभा राहिला आहे. त्यामुळे भारतासोबत आम्हाला संबंध कायम ठेवायचे असून अशा प्रकारच्या वक्तव्यापासून आम्ही दूर राहू असे या निवेदनात म्हटले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!