Home » SP Transfer : बच्चन सिंग अकोल्याचे, बारगळ सीआयडीचे एसपी

SP Transfer : बच्चन सिंग अकोल्याचे, बारगळ सीआयडीचे एसपी

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : राज्यातील काही पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून सोमवारी (ता. 1) काढण्यात आले. त्यानुसार अकोल्याच्या पोलिस अधीक्षकपदी बच्चन सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे. अकोल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना पदनियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.

श्रवण दत्त हे नंदूरबारचे नवे पोलिस अधीक्षक असतील. प्रद्युम्न पाटील यांची नंदूरबार येथुन सीआयडी पुण्याच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. अविनाश बारगळ यांना सीआयडी अमरावतीच्या पोलिस अधीक्षकपदी पाठविण्यात आले आहे. नागपूरच्या पोलिस उपायुक्त चेतना तिडके या अंबाजोगाईच्या नव्या अपर पोलिस अधीक्षक असतील.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!