Home » Bank Scam : सुनील केदारांचा जामीन अर्ज फेटाळला; शिक्षाही कायम

Bank Scam : सुनील केदारांचा जामीन अर्ज फेटाळला; शिक्षाही कायम

by नवस्वराज
0 comment

Nagpur | नागपूर : बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळाप्रकरणी (NDCCB) मुख्य न्यायदंडाधिकारी कार्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदार यांनी निकालाविरोधात सत्र न्यायालायत धाव घेतली होती. नागपूर जिल्हा अतिरीक्त सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे केदार यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे जामिनावर सोडणे, हे चुकीचे ठरेल असे न्यायालयाने म्हटले आहे. (Bail Application of Sunil Kedar Rejected By Session Court Of Nagpur In Bank Scam Case)

सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक (NDCCB) घोटाळा प्रकरणात दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील केदारांना मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी न्यायालयाचे आदेश विधिमंडळाला पाठवले होते. यानंतर सुनील केदारांची आमदारकी रद्द करण्यात आली. कोणत्याही खटल्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. केदार यांना झालेल्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!