Home » New Delhi : इस्त्राईली दूतावास परिसरात स्फोट 

New Delhi : इस्त्राईली दूतावास परिसरात स्फोट 

by नवस्वराज
0 comment

New Delhi  : 26 डिसेंबरला खिलाफत इंडिया या ई-मेलवरून मुंबईतील रिझर्व्ह बॅंकेसह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली. नवी दिल्लीतील चाणक्यपुरी भागात असलेल्या इस्त्राईली दूतावासामागील रिकाम्या फ्लॅटमध्ये मंगळवारी सायंकाळी मोठा स्फोट झाला. स्फोटाची माहिती एका अज्ञात व्यक्तीने दिल्ली अग्निशमन दलाला फोन करून दिली. त्यानंतर अग्निशमन दल, दिल्ली पोलिस विशेष सेलचे पथक, बॉम्ब शोधक पथक, एनआयए, एनएसजी आयबी, रॉचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. (Blast Occurred In Vacant Flat Near Premises Of Israel Embassy At Delhi)

बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसरात शोध घेतला. परंतु स्फोटाशी संबंधित कोणतेही साहित्य हाती लागले नाही. स्फोटाच्या ठिकाणापासून काही अंतरावर एक पत्र सापडले. ज्यात इस्त्राईली राजदूतांचा उल्लेख करण्यात आला होता. पत्रात एक झेंडा गुंडाळलेला आढळला. पत्रावरील बोटांचे ठसे जाणून घेण्याचा प्रयत्न फॉरेन्सिक पथक करीत आहे. दूतावासातील अधिकारी, कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती भारतातील इस्त्राईली मिशनचे उपप्रमुख ओहद नकाश कायनार यांनी दिली.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार पोलिसांनी दूतावास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यात पोलिसांना दोन संशयित दिसून आलेत. पोलिस, एनएसजी आणि एनआयएचे पथक पत्र तसेच दोन संशयितांचा शोध घेत आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2012 आणि जानेवारी 2021 मध्येही दुतावास परिसरात स्फोट झाला होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!