Home » Akola News : पोलिसांसह वकिलांनाही करावा लागेल नवीन कायद्याच्या कलमांचा अभ्यास

Akola News : पोलिसांसह वकिलांनाही करावा लागेल नवीन कायद्याच्या कलमांचा अभ्यास

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाले तरी कायदे मात्र ब्रिटिशकालीनच होते. या कायद्यात बदल करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मागील कुठल्याही सरकारने यादृष्टीने पाऊल उचलले नाही. मात्र आता केंद्र सरकारने इंडियन पीनल कोड (IPC) आणि क्रिमिनल प्रोसिजर कोडचे (CrPC) जुने कायदे रद्द केले असल्यामुळे कायद्याच्या बऱ्याच कलमात बदल होईल. (Central Government Cancelled Old IPC And CrPC Law)

पोलिसांना गुन्ह्यासंबंधित कायद्याच्या नोंदीत बदल करावा लागेल. सध्या तोंडपाठ असलेल्या कलमांऐवजी नवीन कलमांचा अभ्यास करून त्याचे पाठांतर करावे लागणार आहे. केंद्र सरकारने IPC आणि CrPC हे जुने कायदे रद्द करून त्याऐवजी नवीन कायदे तयार केले आहेत. त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली आहे. कायद्यातील कलमांच्या बदलानुसार आता पोलिसांसह अन्य प्राधिकरणांना कारवाई करावी लागेल. पोलिसांना नवीन कलमांनव्ये गुन्हा नोंदवावा लागेल. कायद्यातील कलमांच्या बदलाचा अभ्यास फक्त पोलिसांनाच नव्हे तर वकिलांनाही करावा लागेल. कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेचा परिणाम काही प्रकरणांवर होऊ शकतो.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!