Home » Nagpur News : राहुल गांधींनी आधी सावरकरांना समजून घ्यावे : शरद पोंक्षे

Nagpur News : राहुल गांधींनी आधी सावरकरांना समजून घ्यावे : शरद पोंक्षे

by नवस्वराज
0 comment

Nagpur | नागपूर : राहुल गांधी नेहमी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य करतात. सावरकरांविषयी बोलायला अभ्यास लागतो, उंची लागते. ज्यांना सावरकर कळत नाही, कळलेले नाहीत, त्यांनी केवळ विरोधासाठी त्यांच्याबद्दल काहीही बरळणे योग्य नाही. त्यांना कोणीतरी समजावून सांगावे. नाहीतर त्यांनी आपल्या व्याख्यानाला येऊन सावरकर समजून घ्यावे, असे ज्येष्ठ अभिनेता शरद पोंक्षे म्हणाले. ‘नाथुराम गोडसे’ या नाटकाच्या प्रयोगासाठी ते नागपूरला आले होते. ( Actor Sharad Ponkshe Said At Nagpur Rahul Gandhi Should Not Give Wrong Statement On Vinayak Damodar Sawarkar)

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जेवढे वादग्रस्त आणि बेताल बोलाल तेवढे सावरकर वाचले जातील. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले हे महामानव आहेत. आपण त्यांची पूजा करतो, मात्र त्यांची नकारात्मक बाजू दाखवली की मारामारी आणि हिंसाचार करतो. हे योग्य नाही असे पोंक्षे म्हणाले. नाथुराम गोडसे या नाटकाचे 1 हजार 200 पेक्षा जास्त प्रयोग झालेत. 26 जानेवारी 2024 रोजी नाटकाचा शेवटचा प्रयोग होईल. त्यानंतर त्यात आपण भूमिका करणार नाही. मात्र नाथुराम गोडसेची भूमिका करणाऱ्यांनी त्यांचा अभ्यास करून योग्यरित्या समजून काम करावे, असे मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!