Home » Akola Crime : गोवंश चोरीसाठी 11 जणांना अटक; 16 गुन्हे उघडकीस

Akola Crime : गोवंश चोरीसाठी 11 जणांना अटक; 16 गुन्हे उघडकीस

by नवस्वराज
0 comment

Cattle Slaughter : गोवंश चोरी करून त्यांची कत्तल करणाऱ्या टोळीतील 11 जणांना अकोला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून पोलिसांनी एक इनोव्हा कार, तीन टाटा इंडिका विस्टा, तीन दुचाकी, सहा मोबाइल जप्त केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने केलल्या या कारवाई 16 गुन्ह्यांचा उलगडा झाला. (Akola Police Arrest 11 Member of Gang In Cattle Slaughter Case)

पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, कॉंस्टेबल दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, रवींद्र खंडारे, भास्कर धोत्रे, उमेश पराये, अविनाश पाचपोर, महेंद्र लिमये, प्रमोद डोईफोडे, विशाल मोरे, लिलाधर खंडारे, भीमराव दीपके, सुलनात पठाण, खुशाल नेमाडे, अन्सार अहमद, ऐजाज अहमद, आकाश मानकर, फिरोज खान, स्वप्नील चौधरी, स्वप्नील खेडकर, धीरज वानखडे, अब्दुल माजिद, प्रशांत कमलाकर, मोहम्मद नफीस यांनी ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख शकील शेख जलील, शेख राजीक शेख रज्जाक, मोहम्मद असलम मोहम्मद अशरफ, जाहीद अली राजीक अली, नसीरूद्दीन अलीमुद्दीन, गुलाम शाहीद ऊर्फ बबलू गुलाम, शेख शारीफोद्दीन शेख अलीमोद्दीन, कुदरत खान अहसान खान, शेख इरफान शेख उस्मान, वसीम अहमद जहूर अहमद, अन्सार अहमद मुक्तार अहमद ही आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अकोल्या जिल्ह्यातीलच आहेत. बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर, उरळ, सिटी कोतवाली, अकोटफैल, दहिहंडा, अकोट शहर, हिवरखेड, तेल्हारा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोवंश चोरी केले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!