Home » Mumbai News : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचे चोख उत्तर 

Mumbai News : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचे चोख उत्तर 

by नवस्वराज
0 comment

Mumbai | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने त्याविरोधात 16 डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढला. यात मुंबईतील लहानमोठ्या 18 संघटना व पक्ष सहभागी झाले होते. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास म्हाडा अथवा सिडको अशा शासकीय संस्थांमार्फत करावा, टीडीआरसाठी सरकारने स्वतंत्र कंपनी स्थापन करावी, धारावीतील सर्व नागरिकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशा एकूण सात मागण्यांसाठी वांद्रे येथील अदानी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, एकतर हे सरकार असंवैधानिक आहे. पन्नास खोके कमी पडले म्हणून हे मस्तावलेले बोके मुंबई आणि धारावी गिळायला निघाले आहेत. अदानींच्या दलालांना असे ठेचून टाकू की, पुन्हा अदानीचे नाव घेणार नाही. (Eknath Shinde Replies to Uddhav Thackeray’s Dharavi Mumbai Statement)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी ‘स्वच्छता मुंबई’ कार्यक्रमात ठाकरे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना म्हणाले की, धारावी ही आशिया खंडातील एक मोठी झोपडपट्टी आहे. तेथे राहणाऱ्या लोकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या, त्यांचे जीवनमान सुधारावे हा सरकारचा प्रयत्न आहे. सॅकलिंग नावाच्या कंत्राटदाराचे कंत्राट का रद्द केले? तुमचा विरोध अदानीला होता तर सॅकलिंगला विरोध करण्याचे कारण काय? काही तडजोडी तुटल्यामुळे काही गोष्टी घडत असतील, म्हणून मोर्चे निघत असतील असे गर्भित विधान एकनाथ शिंदे यांनी केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!