Home » Lok Sabha News : लोकसभेचं कामकाज सुरू असतानाच एकाने उडी मारली

Lok Sabha News : लोकसभेचं कामकाज सुरू असतानाच एकाने उडी मारली

by नवस्वराज
0 comment

New Delhi | नवी दिल्ली : लोकसभेच्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने गॅलरीतून उडी मारली. त्यानंतर संसदेची कारवाई स्थगित करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने गॅलरीतून उडी मारली त्याने लोकसभेतील बाकांवरही उड्या मारल्या.

कामकाज सुरू होतं आणि दोन व्यक्ती अचानक गॅलरीत आल्या. त्यांनी उडी मारली. त्यातल्या एकाने बूट काढले आणि अचानक धूर आला. त्यामुळे अनेकांच्या नाकात जळजळ सुरू झाली. खासदारांनी त्या दोघांना घेराव घातला आणि सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं. यामुळे सुरक्षेत मोठी चूक असल्याचं सांगितलं जातय. उडी मारणाऱ्यांपैकी एकाच्या पासवर सागर असे नमूद होते. तो म्हैसूरच्या खासदारांमार्फत आला होता असं सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे खासदारांना धक्का बसला. धुरामुळे उलटीसारखं होऊ लागलं. अशा परिस्थितीत सगळ्या खासदारांनी सभागृहाच्या बाहेरचा रस्ता धरला. पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी कामकाज दुपारी दोन पर्यंत स्थगित केलं. दोन तरुणांपैकी एकानं बूटातून स्प्रे काढला. त्यात पिवळ्या रंगाचा वायू होता. दिल्ली पोलिसांचं एटीएस पथक त्यांची चौकशी करण्यासाठी पोहोचलं आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!