Home » Dhule News : धुळे पोलिसांनी रोखली टवाळखोरांवर वक्रदृष्टी 

Dhule News : धुळे पोलिसांनी रोखली टवाळखोरांवर वक्रदृष्टी 

by नवस्वराज
0 comment

Dhule | धुळे : नुकतीच जालना पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई केली. धुळे शहरासह जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था तसेच खासगी शिकवणी वर्ग असलेल्या 14 भागात मंगळवार 5 डिसेंबर रोजी धुळे पोलिस प्रशासनासह दामिनी पथकाने सकाळी 10 ते दुपारी एक वाजेपर्यंत हे विशेष अभियान राबवले. 380 टवाळखोरांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. (Dhule Police Alongwith Damini Squad Implemented Special Campaign Against Mischievous Roaming On Road)

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग असलेल्या भागात रस्त्यावर विनाकारण फिरणारऱ्या संशयितांवर, विद्यार्थिनींना बघून अतिवेगाने वाहन चालवणारे, सायलेन्सरचा आवाज मोठा असलेले बुलेट चालक, कर्कश आवाजाचे हाॅर्न असलेले तसेच दोनपेक्षा जास्त सिट असलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. ओळखपत्र सोबत नसलेल्यांची झडती घेतली गेली. दामिनी पथकातर्फे विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्यात येऊन त्यांनी निर्भिडपणे पोलिसात तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील दोंडाईचा, बेटावद, शिरपूर, देवपूर, भावरी, निजामपूर येथे देखील ही मोहीम राबवण्यात आली, यामुळे विद्यार्थिनींना दिलासा मिळाला असून टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!