Home » Mumbai News : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक 2026 मध्ये पूर्ण होणार

Mumbai News : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक 2026 मध्ये पूर्ण होणार

by नवस्वराज
0 comment

Mumbai | मुंबई : दादर मधील इंदू मील परिसरातील 4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (International Standard Memorial Of Dr Babasaheb Ambedkar Constructed At Indu Mill Dadar Mumbai)

वर्ष 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र काही कारणामुळे स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात 2018 मध्ये झाली. या स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ला सोपविण्यात आली आहे. स्मारक परिससराचा 68 टक्के भाग हिरवळ असलेला खुला राहिल याशिवाय संशोधन केंद्र, व्याख्यान कक्ष, सभागृह, वाचनालय तसेच 1 हजार 50 चौरस मीटरचे ध्यानकेंद्र असेल.

स्मारकाच्या उभारणीसाठी 1 हजार 89.95 कोटी रूपये खर्च होणार आहे. आतापर्यंत 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. डाॅ बाबासाहेबांच्या 350 फुटाच्या पुतळ्याच्या कामास आता सुरूवात झाल्यामुळे ते पुर्ण होण्यास वेळ लागेल. त्यामुळे मे 2026 मध्ये स्मारकाचे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!