New Delhi | नवी दिल्ली : मुस्लिम महिलांच्या पहेरावाबाबत नियम कडक आहेत. अंगप्रदर्शन करणारे व तोकडे कपडे घालण्यास बंदी आहे. मुस्लिम महिलांना बुरखा घालण्याची सक्ती आहे. मात्र बुरख्याचा वापर फॅशनशोसाठी केल्यामुळे मुस्लिम संघटना नाराज झाली आहे. (Rampwalk In Burka At New Delhi Muslim Organisation Gets Upset)
नवी दिल्ली जवळ असलेल्या मुजफ्फरपूर येथील एका कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फॅशनशोमध्ये मुस्लिम मुलींनी बुरखा घालून रॅम्पवॉक केल्याचा व्हिडीओ समाजिक माध्यमाद्वारा व्हायरल झाला त्यामुळे जमियत-ए-उलेमा ही संघटना नाराज झाली आहे. बुरखासुद्धा नवीन फॅशनला अनुसरून असू शकतो हे दाखवायचा या मागील उद्देश असल्याने वेगवेगळ्या डिझाईन मधील बुरखे घालून फॅशनशो करण्यात आला. असे शो मध्ये सहभागी झालेल्या अलीना या मुलीने सांगितले. मुस्लिम महिलांसाठी काहीतरी वेगळे करावे म्हणून फॅशनशोचे आयोजन केले होते असेही ती म्हणाली.
बुरखा मुस्लिम महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास उपयुक्त ठरू शकतो आणि बुरखा नवीन फॅशनला अनुसरून असू शकतो हे दाखवायचे होते. सर्व विद्यार्थी मेहनती असल्यामुळे त्यांनी याला पाठिंबा दिल्याचे डॉ. मनोज हे शिक्षक म्हणाले.
बुरखा फॅशनशो मध्ये दाखवण्याची वस्तू नाही. भविष्यात अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जमियत-ए- उलेमाचे जिल्हा प्रमुख मौलाना मुक्रम कास्मी यांनी यासंदर्भात दिला आहे.