Home » Akola MSEDCL : वीज ग्राहकांना विनाविलंब सेवा देण्याचे महावितरण कंपनीने नियोजन 

Akola MSEDCL : वीज ग्राहकांना विनाविलंब सेवा देण्याचे महावितरण कंपनीने नियोजन 

by नवस्वराज
0 comment

Akola |अकोला : वीज ग्राहकांना विनाविलंब आणि दर्जेदार सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. रोहित्रात बिघाड निर्माण झाल्यास अथवा जळाल्यास ताबडतोब दुरुस्ती किंवा बदलविण्यात येणार आहे. (Defective Or Burnt Distribution Transformers Will Be Repaired Or Replaced Immediately Order By DCM Devendra Fadnavis to MSEDCL)

रोहित्रात बिघाड निर्माण झाल्यास अथवा जळाल्यास वीज ग्राहकांनी महावितरण कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००२१२३४३५, १८००२३३३४३५ अथवा महावितरण च्या अॅप वरून सविस्तर तक्रार नोंदवावी. रोहित्र जळाल्यास अथवा त्यात बिघाड निर्माण झाल्यास ग्राहकांना त्रास सोसावा लागतो. ग्रामीण भागातील ग्राहकांना जास्त त्रास होतो. दुरुस्ती करण्यास किंवा बदलविण्यास विलंब लागतो. ही समस्या विनाविलंब सोडविण्यासाठी कंपनीने ऑईल तसेच दुरुस्त रोहित्रांचा साठा तयार ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. नादुरुस्त रोहित्राची माहिती प्राप्त होताच ग्रामीण भागात तीन दिवसात दुरूस्ती अथवा बदलविण्यात येईल. रोहित्र दुरुस्ती अथवा बदलविण्यासाठी होणारा विलंब आणि गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक अथवा महावितरण अॅपवर सविस्तर तक्रार नोंदवावी. रोहित्र दुरुस्ती अथवा बदलविण्यासाठी ग्राहकांना कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!