Nagpur | नागपूर : १९७४ मध्ये स्थापना झालेली अखिल भारतीय ग्राहक पंचायत 2023-2024 सुवर्णमोहत्सवी वर्ष म्हणून साजरा करणार आहे. सुवर्णमोहत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा 26 नोव्हेंबर रोजी अहिल्यादेवी मंदिर सभागृह धंतोली, नागपूर येथे संपन्न होणार आहे. (Golden Jubilee Year Inauguration Ceremony of Akhil Bhartiya Grahak Panchayat Celebration At Nagpur On 26 नोव्हेंबर 2023)
कार्यक्रमाला माजी कुलगुरू डाॅ. वेदप्रकाश मिश्रा, अर्थतज्ञ अनिल बोकील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शाह, राष्ट्रीय संघटनमंत्री दिनकर सबनीस, सहसचिव जयंतीभाई कथीरिया, पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री गजानन पांडे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अॅड. स्मिता देशपांडे प्रमुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे उद्घाटन वेदप्रकाश मिश्रा यांचे हस्ते होणार असून विशेष सत्रात अनिल बोकील हे मार्गदर्शन करतील.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्याला अधिक बळकटी यावी प्रचार, प्रसार व्हावा, ग्रामीण भागात कार्याचा विस्तार व्हावा यादृष्टीने संपूर्ण वर्ष भर कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उद्घाटन सोहळ्यासाठी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातून ग्राहक चळवळीतील 500 कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नारायण मेहरे विदर्भ प्रांत अध्यक्ष, अजय गाडे विदर्भ प्रांत संघटनमंत्री व नितिन काकडे विदर्भ प्रांत सचिव यांनी कळवले आहे.