अकोला : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत गलिच्छ, गढूळ तसेच सर्वसामान्यांना न पटणारे झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता चारही बाजूने त्रस्त आहे, तर सरकार व विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात वेळ काढत आहे. कोण सरकारमध्ये व कोण विरोधी पक्षात हे सामान्य जनतेच्या आकलनाच्या बाहेर गेले आहे. पितृ पंधरावड्यात श्राद्ध घातल्यास सर्व काही सुरळीत होते, अशी श्रद्धा आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जयप्रकाश बाविस्कर यांच्या संकल्पनेतून जिल्हा संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या नेतृत्वात मनसे अकोला जिल्हा अध्यक्ष पंकज साबळे यांनी सामूहिक श्राद्ध घातले.
शहर संघटक अरविंद शुक्ला, शहर अध्यक्ष सौरभ भगत, शहर अध्यक्ष राकेश शर्मा, जिल्हा सचिव मोहन मते, उपशहर अध्यक्ष राजेश पिंजरकर, मुकेश धोंडफळे, शुभम कवोकार, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष सचिन गालट, विभाग अध्यक्ष अमोल भेंडारकर, आकाश शेजे आदी पदाधिकारी यांनी स्थानिक यमुना तरंग कॉम्प्लेक्स, मूर्तिजापूर रोड येथे सामूहिक श्राद्ध घालून सज्जनशक्तीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तसेच सध्या सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाला कुठे तरी अंकुश लागावा. येणाऱ्या काळात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर सतत लढा देणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बद्दल लोकांनी सहानुभूती पूर्वक विचार करण्यासाठी अभिनव असे आंदोलन केले.