नवी दिल्ली : महिलांचे चिरतारुण्य आणि सौंदर्यासाठी जगात एक गाव प्रसिद्ध आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधे हुंजा खोरे असल्याचे सांगितले जाते. दिल्लीपासून या ठिकाणाचे अंतर अंदाजे ८०० किलोमीटर आहे. पर्यटनासाठी एकदा अवश्य भेट द्यावी असा या हुंजा खोऱ्याचा उल्लेख २०१९ मध्ये फोर्ब्स या मासिकात केला आहे.
येथील महिलांचे तारूण्य आणि चेहऱ्यावरील लकाकी वयाच्या ८० वर्षापर्यंत टिकून असते. हुंजा खोऱ्यातील निसर्ग आणि वातावरणामुळे येथील नागरिक १०० वर्षाचे आयुष्य जगतात. जागतिक स्तरावर ब्लू झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुंजा खोऱ्यातील नागरीकांचे राहणीमान, खाण्यापिण्याची पद्धत इतरांपासून वेगळी असल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम नागरीकांच्या प्रकृतीवर होतो. त्यामुळे ते निरोगी दीर्घ आयुष्य जगतात. १९७० च्या सुरुवातीस नॅशनल जिओग्राफिकने या विषयावर लेखमाला चालवली होती.