अमरावती : पिंपळखुटा गावातील एक ४० वर्षीय व्यक्ती मागील महिनाभरापासून बेपत्ता होती. दरम्यान त्याचा तिघांनी खून करून मृतदेह गावालगतच्या जंगलात पुरल्याची कुणकुण बुधवारी रात्री गावकऱ्यांना लागली. त्यामुळे गुरुवारी (दि. ३१) पोलिसांच्या उपस्थितीत जमिनीत पुरलेला कुजलेला मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह बेपत्ता व्यक्तीचा असल्याचाी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र याप्रकरणी अधिकृती खुलासा डीएनए अहवालानंतरच होईल. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गुरुवारी रात्री गावातील एकाला ताब्यात घेतले आहे.
विलास रंगराव कोठे (४०, रा. पिंपळखुटा, अमरावती) असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. विलास मागील २५ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी २० ऑगस्टला फ्रेजरपुरा पोलिसांत दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद घेतली. दरम्यान ३० ऑगस्टला गावातील एकाने दारूच्या नशेत गावात या प्रकरणी बडबड केली. त्यामुळे गावकऱ्यांना विलास बेपत्ता असल्याबाबत कुणकुण लागली. ही माहिती गुरुवारी फ्रेजरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांना देण्यातआली. तसेच मृतदेह गावालगत असलेल्या जंगल भागात पुरल्याचीही माहिती समोर आली. त्यामुळेपोलिसांनी महसूल अधिकारी, फॉरेन्सिक चमूच्या उपस्थितीत संशयित ठिकाणी खोदकाम सुरू केले. त्यावेळी जमिनीत एक कुजलेला मृतदेह आढळूनआला. मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी हाडाचा सापळा होता.