अकोला : न्यायालयाच्या एका निर्णयाला विरोध करण्याचे निमित्त करून गेल्या तीन महिन्यांपासून ईशान्येकडील मणिपूरमध्ये कुकी ( ख्रिस्ती) समाजाकडून नियोजनपूर्वक हिंसाचार घडवून काश्मीरप्रमाणे मणिपूर हिंदूविहिन करण्याचे मोठे षड्यंत्र सुरू आहे. देहलीत मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार घडवून लहान मुलांच्या माध्यमातून हिंदूंवर, शासनाच्या बसेस तसेच सार्वजनिक मालमत्तेवर आक्रमणे करण्यात आले.३१ जुलै २०२३ रोजी श्रावणी सोमवारी हरयाणातील नूंह ( मेवात ) येथे महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी गेलेल्या हजारो हिंदू भाविकांवर भीषण हल्ला करण्यात आला.
केवळ तीन घटनाच नव्हेत तर देशभरात अनेक ठिकाणी पूर्वनियोजित हिंसाचाराचे प्रकार सुरू आहेत. देशातील सहिष्णु हिंदूंमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. देशाची सुरक्षा, एकता, अखंडता आणि शांतता नष्ट करण्याचे एक भयंकर षडयंत्र आहे. या माध्यमातून मोठ्या गृहयुद्धाची सिद्धता सुरू असल्याची शंका निर्माण होते.
अशा देश आणि समाज विघातक कृत्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदू जनजागृती समिती अकोलातर्फे अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांना २३ ऑगस्टला निवेदन देण्यात आले.
यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या अश्विनी सरोदे, हभप गिरीश कुळकर्णी महाराज, महानगर शिवसेना प्रमुख योगेश अग्रवाल, माजी नगरसेवक शशिकांत चोपडे, योगेश धुमाळ, गजानन टाले, राजेश क्षीरसागर, कैलास रणपिसे, अजय खोत तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते असे धीरज राऊत यांनी कळवले आहे.