Home » थकबाकीदार तुपाशी नियमित वीज ग्राहक उपाशी

थकबाकीदार तुपाशी नियमित वीज ग्राहक उपाशी

by नवस्वराज
0 comment

अकोला : विजेची मागणी वाढल्याने मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी महावितरण कंपनीतर्फे आपत्कालीन भारनियमन राबविण्यात येत असल्याचे वृत सर्वप्रथम ‘ नवस्वराज’ ने प्रकाशित केले. विजेची वाढलेली मागणी, वीज गळती, वीज बिलांची थकबाकी जास्त असणाऱ्या फिडरवर भारनियमन घेण्यात येत आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे कोराडी येथील ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन विजनिर्मिती संच वार्षिक देखभालीसाठी बंद आहेत.

कुठल्याही फिडरवर वीज गळतीचे प्रमाण जास्त असणे हे कंपनीचे अपयश आहे, कारणे काहीही असोत. वीज देयक वेळेवर भरणे ही ग्राहकांची जबाबदारी असली, तरी वाढलेल्या थकबाकीसाठी कंपनीचे दुर्लक्ष देखील तितकेच कारणीभूत आहे. वार्षिक देखभालीसाठी निर्मिती संच बंद ठेवणे आवश्यक आहे. यासाठी निर्मिती, महावितरण कंपनी तसेच ग्राहक कोणीही जबाबदार नाही.

वीज गळती आणि वीज देयक थकबाकीचे कारण दाखवून काही निवडक फिडरवर भारनियमन राबविणे, मग ते आपत्कालीन का असेना योग्य नाही. कारण या फिडरवर नियमित वीज देयक भरणारे बहुसंख्य ग्राहक आहेत. महावितरण कंपनीने स्वतःचे अपयश तसेच थकबाकीदारांची शिक्षा नियमित देयक भरणाऱ्यांना देऊन अन्याय करू नये अशी वीज ग्राहकांची मागणी आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!