अकोला : पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत अकोला जिल्ह्यात ४०३.७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. यातील सर्वांत जास्त पर्जन्यमान बाळापूर तालुक्यात झाले आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जूनपासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा पंचनामा करण्यात येत आहे.
महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार अकोट तालुक्यात ७३ टक्के पाऊस झाला आहे. येथील पावसाचे प्रमाण २९१.३ मिलिमीटर आहे. तेल्हारा तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. येथे १०२ टक्के पाऊस झाला आहे. त्याचे प्रमाण ३९३.३ मिलिमीटर आहे. बाळापूर तालुक्यात १३६ टक्के अर्थात ४९२.४ मिलिमीटर पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे.
पातूर तालुक्यात ८६ टक्के पाऊस झाला आहे. त्याची आकडेवारी ४२१.४ मिलिमीटर नोंदविण्यात आली आहे. अकोला तालुक्यात ११३ टक्के पाऊस झाला आहे. त्याचे प्रमाण ४५७ मिलिमीटर आहे. बार्शीटाकळी तालुक्यात ४०४.३ मिलिमीटर म्हणजेच ९७.२ टक्के पर्जन्यमान झाले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील पावसाची टक्केवारी ८५ असून त्याचे प्रमाण ३५६.८ मिलिमीटर आहे. अमरावती विभागाची पावसाचे प्रमाण ५३१.८ मिलिमीटर आहे.