Home » मोर्णा नदीकाठावरिल धोकादायक बांधकाम

मोर्णा नदीकाठावरिल धोकादायक बांधकाम

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर येथे उगमस्थान असलेली मोर्णा नदी महानगरातून वाहते. नदीवर रामसेतू सह एकूण पाच पूल आहेत. पूर्वी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे पाणी नदीत सोडले जाते. मोर्णा नदी स्वच्छता हे अकोलेकरांचे भंगलेले स्वप्न आहे.

नदीला वर्षभर पाणी नसले तरी पावसाळ्यात नदीच्या उगमस्थानी, पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली तसेच नदीला मिळणाऱ्या उपनद्या आणि नाल्यांना पूर आल्यास मोर्णा विक्राळ रूप धारण करते. मध्यंतरी नदीचे करण्यात आलेले खोलीकरण आणि बांधण्यात आलेल्या पूरसंरक्षण भिंतीमुळे नदीचे पाणी काही भागात शिरत नाही. वर्ष १९६२, १९७८, १९८३ साली मोर्णेला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीव व वित्तहानी झाली. नदीकाठी राहणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने महापूरानंतर पीडिताना वेळोवेळी आर्थिक सहाय्य केले. अतिशय स्वस्तात घर बांधण्यासाठी प्लाॅट देखील उपलब्ध करून दिले. काही लोकांनी नवीन जागेवर स्थलांतर केले तर काही प्लाॅटची विल्हेवाट लावून पुन्हा नदीकाठावर जुन्या ठिकाणी रहाण्यास आले.

नदीच्या काठावर अनेक पक्क्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. बांधकामाच्या नियमांबाबत सर्वसामान्यांना वेठीस धरणारे महानगरपालिका प्रशासन पुराचा धोका असलेल्या क्षेत्रात बांधकाम करण्यासाठी मंजूरी कशी देते? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!