नागपूर : राज्यभरातील अनेक मोबाईल धारकांना गुरुवारी सकाळपासून अलर्टचे मेसेज मिळण्यास सुरुवात झाली. या मेसेजवर भारत सरकारचे नाव लिहिलेले असल्यामुळे मोबाईल ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही वेळातच ही एक चाचणी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लोकांचा जीव भांड्यात पडला.
आपत्ती आणि आपत्कालीन प्रसंगी सूचना देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेची चाचणी गुरुवारी करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट असा मेसेज आला. या मेसेज मध्ये भारत सरकारचे नाव असल्यामुळे अनेकांना भीती वाटली. मात्र काही वेळातच सेल्युलर कंपन्यांनी ही महत्त्वाची चाचणी असल्याचे निष्पन्न केले. अतिवृष्टी, पूर आणि इतर आपत्ती संदर्भात सूचना देण्यासाठी पॉपअप मेसेज अलर्टची ही चाचणी होती असे सिल्वर कंपन्यांनी स्पष्ट केले. मोबाईल धारकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही प्रशासन आणि सेल्युलर कंपन्यांकडून करण्यात आले आहे.