Home » शिंदेंचे इमर्जन्सी लँडिंग, सर्व कार्यक्रम रद्द

शिंदेंचे इमर्जन्सी लँडिंग, सर्व कार्यक्रम रद्द

by नवस्वराज
0 comment

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने पायलटला इमर्जन्सी लँडिंग करावे लागते. मुंबईतील राजभवनाच्या हेलीपॅडवर शनिवार, १३ मे २०२३ रोजी हा प्रकार घडला. या घटनेमुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा दौराच रद्द करावा लागला.

मुख्यमंत्री शिंदे हे सातारा दौऱ्यावर जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड निर्माण झाला. शिंदे हे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा आणि पाटण येथे दौऱ्यावर जाणार होते. हेलिकॉप्टर आकाशात भरारी घेत असतानाच त्यात बिघाड निर्माण झाला. पायलटने आपल्यास्तरावर हा बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करून मुख्यमंत्र्यांचे उड्डाण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश न आल्याने नियंत्रण कक्षाला कळवित पायलटने इमर्जन्सी लँडिंग केले.

मुंबईतील राजभवनावरून मुख्यमंत्री शिंदे हे सातारा-पाटण येथे  कार्यक्रमासाठी जात होते. काही अंतर हेलिकॉप्टर उडाल्यानंतर त्यात बिघाड झाला. इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतरही हेलिकॉप्टरच्या दुरूस्तीचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी काही काळासाठी तेथेच प्रतीक्षा केली. परंतु दुरूस्तीत तज्ज्ञांना यश न आल्याने अखेर मुख्यमंत्र्यांचा सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी दुसरे हेलिकॉप्टर मागविण्यात आल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!