नवी दिल्ली : अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने बहाल करतान दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने एकाच दिवशी ९९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे मोठे फेरबदल केले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केजरीवाल यांनी त्यांनी पहिल्यांदा प्रशासकीय विभागाचे सचिव आशिष मोरे यांची हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांनी कारागृह विभागातील ९९ अधिकाऱ्यांची बदलीचे आदेश जारी केले. प्रशासकीय विभागाचे मंत्री सौरभ भारव्दाज यांनी या विभागाचे सचिव आशिष मोरे यांना पदावरुन हटविले. आशिष मोरे यांच्या जागी १९९५ बॅचचे सनदी अधिकारी अनिल कुमार सिंह यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन नेहमीच वाद झाले आहेत. यापूर्वी बदल्यांचे अधिकाऱ्यांवर उपराज्यपाल यांचे नियंत्रण होते. परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाने आता हे अधिकार निवडून आलेल्या दिल्ली सरकारकडे राहणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का व केजरीवाल सरकारला दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर दिल्लीतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आता केजरीवाल सरकार काढणार असल्याचे मानले जात आहे. त्यातून सरकारसाठी पोषक नसलेल्या अधिकाऱ्यांना हटविण्यात येईल, असे संकेत राजकीय विश्लेषकांनी दिले आहेत.