Home » अकोल्यात अवैध गौणखनिज करणाऱ्या कंपनीला दंड

अकोल्यात अवैध गौणखनिज करणाऱ्या कंपनीला दंड

by नवस्वराज
0 comment

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे वडगाव येथील पाच गटातून मंजुरीपेक्षा जास्‍त उत्‍खनन व अकोला तालुक्यातील मौजे निपाणा येथील एका गटातून बेकायदा गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित कंपनीला २ कोटी ७९ लाख ९१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आमदार हरीश पिंपळे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीला आमदार हरीश पिंपळे व उत्खनन करणारी कंपनी राजपथचे अधिकारी देखील उपस्थित होते असे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी यांनी अवैध उत्‍खनन केल्‍याबद्दल गैरअर्जदार यांना २ कोटी ७९ लक्ष ९१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची वसूली संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!