Home » अकोल्याच्या जुने शहर भाजी बाजारात हवे पोलिस

अकोल्याच्या जुने शहर भाजी बाजारात हवे पोलिस

by नवस्वराज
0 comment

अकोला : जुने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात दर रविवारी मोठा भाजी बाजार भरतो. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथे पूर्णवेळ वाहतूक पोलिस तैनात करण्याची गरज आता भासत आहे.

जुने शहरात आसपासच्या खेड्यातून भाजी विक्रेता येतात. त्यामुळे बाजाराचा विस्तार वाढला आहे. नवीन शहरातील नागरिक देखील दर रविवारी मोठ्या संख्येने भाजीपाला खरेदीसाठी या बाजारात हजेरी लावतात. जुन्याशहराची लोक वस्ती नजीकच्या भौरद गावापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे लोखंडी पुलापासून डाबकी रोडकडे जाणाऱ्या मार्गावर दररोज प्रचंड वाहतूक असते.

छत्रपती शिवाजी महाराज नगरातील रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात दुपारी दोनपर्यंत मोठी गर्दी असते. खरेदी साठी येणारे ग्राहक भीमनगर चौकात दुचाकी वाहने लावतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अनेकदा खोळंबा होतो. बाजारातून लहान, मोठ्या वाहनांचे येणे-जाणे सुरू असते त्यामुळे देखील अडचण होते. दर रविवारी दुपारपर्यंत भाजी बाजारातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!