Home » उत्तराखंड : परीक्षेत कॉपी केल्यास थेट जन्मठेप

उत्तराखंड : परीक्षेत कॉपी केल्यास थेट जन्मठेप

by नवस्वराज
0 comment

डेहराडून : सार्वजनिक परीक्षेत कॉपी केल्यास अत्यंत कठोर शिक्षा करणारा देशातील सर्वांत कडक कायदा उत्तराखंड राज्यात लागू झाला आहे. येथे स्पर्धा परीक्षेत कॉपी करणाऱ्यांना थेट जन्मठेप आणि १० कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. राज्यपाल गुरमित सिंह यांनी तातडीने या कायद्याला मंजुरी प्रदान केली आहे.

नव्या कायद्यानुसार परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने जर कॉपी केली, तर त्या उमेदवाराला पुढील १० वर्षांसाठी प्रतिबंधीत करण्यात येईल. हा नवा नियम ‘अँटी कॉपींग लॉ’ म्हणून ओळखला जाईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुस्कर सिंग धामी यांनी या नव्या नियमाबाबत माहिती दिली. “भरती परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या किंवा चीटिंग करून अयोग्य मार्ग वापरणाऱ्या उमेदवारांना पुढील १० वर्षांसाठी बॅन केले जाईल. हा निर्णय यूकेपीएससी पेपर लिकनंतर घेण्यात आला आहे, या पेपर लिकमुळे सुमारे १.४ लाख उमेदवारांची पटवारी लेखपाल परीक्षा रद्द करण्यात आली होती. सरकारी भरतीदरम्यान होणारी कॉपी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा देशातील सर्वात कठोर कॉपी विरोधी कायदा असणार आहे. गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात येणार आहे, यासह त्यांची संपत्ती देखील जप्त केली जाणार आहे.’

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!