Home » अंगारकी चतुर्थीला नागपुरात उसळला जनसागर

अंगारकी चतुर्थीला नागपुरात उसळला जनसागर

by नवस्वराज
0 comment

नागपूर : पौष महिन्यातील सर्वांत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंगारकी तीलकुंद चतुर्थीच्या निमित्ताने नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सोमवारी मध्यरात्रीपासून भाविकांनी मंदिरात गर्दी करण्यास सुरुवात केली.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने पौष महिन्यात येणाऱ्या तीलकुंद चतुर्थीच्या दिवशी भाविक दरवर्षी नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. सरासरी या दिवशी सुमारे दीड ते दोन लाख भाविक टेकडी गणेशाच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी टेकडीच्या बाप्पाला तिळाच्या मोदकांचा नैवैद्य अर्पण केला जातो. पौष अंगारकी चतुर्थीमुळे टेकडी परिसरातील वाहतूक सोमवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली होती. या परिसराला मंगळवारी यात्रा स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

टेकडी मंदिर संस्थांनच्यावतीने पौष अंगारकी चतुर्थी निमित्त महाप्रसादाचे विरतणही करण्यात आले. अनेकांनी हा मुहूर्त साधन नवे घर, वाहनही आदी खरेदी केले. त्याच्या चाव्या भाविकांनी टेकडीच्या बाप्पाच्या चरणी अर्पण केल्या. अकोल्यात सायब स्मृती मंगल कार्यालयाच्या जवळ असलेल्या स्वयंभू मांदार गणेश मंदिरातही हा उत्सव साजरा करण्यात आला. पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपतीचेही अनेकांनी पौष अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शन घेतले. नागपूरच्या जवळच असलेल्या आदासा गणेशाचेही अनेकांनी दर्शन घेतले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!