अकोला : संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान करत काढलेला मोर्चा हा आक्रोश मोर्चा नसून सत्तेची खुर्ची गेल्यानंतर होणारा थयथयाट मोर्चा असल्याची टीका व पाकिस्तानला योग्य धडा शिकून पंतप्रधानाचा अपमान सहन केल्या जाणार नाही, असा इशारा भाजपा नेते आमदार रणधीर सावरकर यांनी दिला.
भाजपाच्यावतीने माफी मांगो, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भुट्टो याच्या निषेधार्थ आंदोलनात ते बोलत होते. आमदार सावरकर म्हणाले आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या शतकात विज्ञानाधिष्ठित मानवतेची आणि समभावाची शिकवण दिली, संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली, त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येकासाठी प्रतिपरमेश्वर आहेत. त्यांचाही खासदार संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांनी अपमान केला आहे. त्यानंतर साधा खुलासा आणि माफी सुद्धा मागितली नाही. हा त्यांचा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा सुरू झाला असे, यावेळी आमदार वसंत खंडेलवाल यांनी सांगितले.
अकोला महानगरात संतप्रेमी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक या निषेध सभेत व पुतळा दहन कार्यक्रमात सहभागी झाले. यावरून जनतेचा आक्रोश लक्षात येतो. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडी व पाकिस्तानच्या नेत्यांना योग्य वेळी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी याप्रसंगी दिला.
आमदार गोवर्धन शर्मा, महापौर अर्चना मसने, अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत माधव मानकर, संजय जिरापुरे, संजय गोटफोडे, संजय गोडा, जयंत मसने, संजय बडोने, मनीराम ताले, पवन महल्ले, गिरीश जोशी, अनुप शर्मा, सिद्धार्थ शर्मा, संतोष पांडे, मनोज साहू, देवेंद्र तिवारी, विनोदसिंग ठाकूर, अजय शर्मा, हरीश भाई, जानवी डोंगरे, चन्दा ठाकूर, लाला जोगी, नीता बागडे, रविता शर्मा, चंद्रकांत रूपारेल, मनीष बाछुका, विक्की ठाकूर, गणेश सपकाळ, ममता शुक्ला, राजेंद्र गिरी, रमेश सुरेश जाधव, गणेश अंधारे, गणेश पावसाळे, गोपाल मुळे, रितेश जामनारे, अभिजित बांगर, धनंजय धबाले, विनोद मापारी, वैकुंठ ढोरे, मनीष बुंदेले, श्रीकांत गावंडे, प्रवीण जगताप, सचिन देशमुख, मंडळ अध्यक्ष अमोल गोगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पातूर येथेही आंदोलन
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहराच्यावतीने निषेध व्यक्त कारण्यात आला. पातूर येथे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या पुतळा जाळून हा निषेध करण्यात आला. यावेळी पातूर तालुका अध्यक्ष रमन जैन, विजयसिंह गहिलोत, प्रेमानंद श्रीरामे, चंद्रकांत अंधारे, राजू उगले, अभिजित गहिलोत, अनंता बगाडे, मंगेश गाडगे, विनेश चव्हाण, सचिन ढोणे, संदीप तायडे, दिलीप बगाडे, गणेश गाडगे, अबुल हसन खा, राजेश आवटे, संजय गोतरकार, मंगेश केकन, सचिन बारोकार, ज्ञानेश्वर जाधव, किरण टप्पे, गणेश गिरी, भागवत खंडारे, रुपाली राऊत, वनिता बगाडे, डिगांबर गोतरकर, सतीश इंगळे, सचिन शेवलकार, नीलेश जाधव, संतोष तिवाले आदी उपस्थित होते.