Home » अकोल्यातील ‘अतिक्रमण हटाव’ आणखी तीव्र

अकोल्यातील ‘अतिक्रमण हटाव’ आणखी तीव्र

by नवस्वराज
0 comment

अकोला : महापालिकेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून अकोला शहरात सुरू करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम बुधवार, 7 डिसेंबरला तीव्र करण्यात आली.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन ते किल्ला चौकापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा असलेली अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. जेसीबी यंत्र आणि अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटविण्यात आलीत. सहाय्यक नगर रचनाकार राजेंद्र टापरे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, गजानन घोंगे, रितेश टेकडे, सुरक्षा रक्षक रुपेश इंगळे, वैभव कवाळे, सय्यद रफिक, योगेश कंचनपुरे, मनीष भोंबळे, स्वप्निल शिंदखेडकर, गुलाम मुस्तफा, अब्दुल रज्जाक, स्वप्निल पवार, धीरज पवार, पवन चव्हाण, सोनू गायकवाड, अजिंक्य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरीश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सुरज लोंढे, नितीन सोनोने आदी कर्मचाऱ्यांनी ही मोहीम पार पाडली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!