Home » ‘समान नागरी कायदा’ लागू करण्यासाठी गुजरातमध्ये समिती

‘समान नागरी कायदा’ लागू करण्यासाठी गुजरातमध्ये समिती

by नवस्वराज
0 comment

अहमदाबाद : गुजरात सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ही माहिती दिली.

गुजरात राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका समितीचे गठण केले जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील. या समितीत तीन ते चार इतर सदस्य असतील. संघवी म्हणाले की, “देशभरातील नागरिकांकडून ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे गुजरात सरकारने या महत्त्वाच्या मुद्द्यावर आज निर्णय घेतला आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील अनेक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी याबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यास हे कार्य करणारे गुजरात देशात पहिले राज्य ठरेल.” देशातील अधिकृत वृत्तसंस्थांनीही याबाबत वृत्त दिले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!