Home » अकोल्यातील विवरा येते तिरडीवरील मृत तरुण उठून बसला

अकोल्यातील विवरा येते तिरडीवरील मृत तरुण उठून बसला

by नवस्वराज
0 comment

अकोला : पातूर तालुक्यातल्या विवरा या गावात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. 26 ऑक्टोबर 2022 भाऊबीजेच्या दिवशी रात्री ही घटना घडली. 21 वर्षीय तरुणाला अंत्यसंस्कारासाठी नेत असताना तो तिरडीवर उठून बसला. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी या युवकाला पाहण्यासाठी गर्दी केली. गाव जमा झाल्यानंतर पातूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली जात आहे.

मरण पावलेल्या तरुणावर काळी जादू केल्याचा आरोप युवकांच्या नातेवाईकांनी केला आहे. विवरा येथील 21 वर्षीय तरुण प्रशांत मेसरे याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. नातेवाईक व ग्रामस्थ जमले. अंत्यसंस्काराची तयारी झाल्यानंतर अंत्ययात्रा ही काढण्यात आली. स्मशानभूमीकडे ही यात्रा जात असताना तिरडीवरील मृत युवकाची हालचाल सुरू झाली. तो उठून बसला. नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. मुलावर काळी जादू केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी यावेळी केला आहे. दरम्यान या युवकाचा मृत्यू झाल्याचे हे नातेवाईकांना कसे कळले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते का. त्याला कोणता आजार होता का, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!