अकोला : नवरात्रीत बरेच लोक उपवास करतात, पदार्थ बनवण्यासाठी प्रमुख्याने साबुदाणा व भगरचा वापर केल्या जातो. भेसळयुक्त भगरीमुळे राज्यातील अनेक जणांना विषबाधा झाल्याची प्रकरणे समोर आली. अन्न व औषध प्रशासन विभागाने अनेक दुकानात छापे घालून कारवाई केली. या पार्श्वभूमीवर नागरीकांनी देखील सतर्कता बाळगावी. भगर व ईतर उपवासाच्या पदार्थांची खरेदी हातगाडी वरून न कराता, नोंदणीधारक आस्थापनांकडूनच करावी. पॅकबंद घ्यावेत, पॅकेटवरील उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर, अंतिम वापरण्याची मुदत कधी संपते इत्यादी तपशील तपासून घ्यावा.
विक्रेत्याकडून पक्के खरेदी बील घ्यावे. भगर व ईतर उपवासाचे पदार्थ बनवताना स्वच्छ वातावरणात तसेच पिण्यायोग्य पाण्यात बनवावे. सकाळी बनवलेल्या भगरीचे रात्री सेवन करू नये. नागरीकांनी कुठलेही अन्न पदार्थ, तेल, मिठाई वगैरे खरेदी करतांना जाणीवपूर्वक दक्षता घ्यावी असे आवाहन राज्य अन्न व औषध प्रशासन विभागा तर्फे करण्यात आले आहे. परंतु नागरीकांच्या जिवीताशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.