Home » उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरूजनांचा गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानकडून गौरव

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरूजनांचा गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानकडून गौरव

by नवस्वराज
0 comment

अकोला : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा अकोल्यातील गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने गौरव करण्यात आला.

अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, अमरावती येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. संजय तिडके, डॉ. नितीन देऊळकर, डॉ. अशोक सोनवणे, प्रा. शारदा बियाणी, प्रा. संगिता देवकर यांना श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात गौरविण्यात आले. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. रणजित पाटील, अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे, डॉ. एल. एल. कुलट, गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन बुंदेले यावेळी उपस्थित होते.

प्रा. डॉ. विवेक हिवरे, जीवन देशमुख, प्रा. गणेश खेकाळे, प्रा. सचिन भुतेकर, प्रा. कांचन कुंभलकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे रामेश्वर बरगट, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साथसेवक फाउंडेशन, तरंग फाउंडेशनचे पदाधिकारी आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहन बुंदेले अध्यक्ष यांनी केले. सूत्रसंचालन सुरभी दोडके यांनी केले. वैष्णवी आसेकर यांनी आभार मानले. सतीश अस्वार, प्रज्वल ईसाळ, साक्षी ठोकळे, साक्षी घाटोळे, राहुल नितोने, अक्षय वानखडे, सुमित शिरसाट, गौरव वानखडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!