नागपूर : स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय वैज्ञानिकांनी मोठे योगदान दिले, विचार श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींची शाळाच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे यांनी व्यक्त केले.
श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान भारती तर्फे स्वातंत्र्यप्राप्तीच्या शस्त्रांमध्ये विज्ञान हे एक प्रभावी शस्त्र कसे ठरले, याबाबतची माहिती देणारे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला विज्ञान भारतीच्या पदाधिकारी साठे मॅडम, देहडकर मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे, उपमुख्याध्यापक आष्टीकर यांची उपस्थिती होती.
श्रीमती साठे यांनी विद्यार्थिनींना विज्ञान भारती तर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. आधुनिक कालखंडात विकासाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला पाश्चात्त्यांकडून मिळाला असे सांगितले जाते. परंतु आपला भारत देश हा स्वतः अत्यंत समृद्ध देश आहे. जगाला (मानवजातीला) गौरवांकित ठरतील अशा अनेक विषयांचे संशोधन आपल्या वैज्ञानिकांनी केले आहे. विज्ञान भारती अशा महान संशोधकांचा परिचय करून देणार आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान भारतीच्या स्कूल कॉर्डिनेटर विज्ञान शिक्षिका स्नेहल इंगळे यांनी केले.