Home » सरकारी कर्मचाऱ्यांना वंदे मातरम‌् म्हणत करावे लागणार संभाषण

सरकारी कर्मचाऱ्यांना वंदे मातरम‌् म्हणत करावे लागणार संभाषण

by नवस्वराज
0 comment

मुंबई : महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे फोनवर बोलताना ‘हॅलो’ नव्हे तर ‘वंदे मातरम्’ म्हणत संभाषणाची सुरुवात करावी लागणार आहे. नवनियुक्त वन, मत्स व्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत आहे. हा केवळ एक शब्द नसून भारत मातेबद्दलच्या भारतीयांच्या भावनांचे प्रतीक आहे 1875 मध्ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या या गाण्याने त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांना ऊर्जा दिली. हे आई मी तुला नमन करतो ही भावना व्यक्त करून बंकीमचंद्रांनी अनेकांच्या हृदयात देशभक्तीची ठिणगी पेटवली, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!