Home » केजरीवाल सरकारचे विकास मॉडेल पाहायला ‘गुजरात भाजप’ दिल्लीत

केजरीवाल सरकारचे विकास मॉडेल पाहायला ‘गुजरात भाजप’ दिल्लीत

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : गुजरात भाजपचे 17 सदस्यीय शिष्टमंडळ दोन दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीत येत आहे. या संपूर्ण दौऱ्यात गुजरात भाजपचे शिष्टमंडळ राजधानीत केजरीवाल सरकारने केलेल्या कामांची पाहणी करणार आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या विकासामुळे गुजरातचे नावलौकिक झाले होते. याच ‘गुजरात मॉडेल’चा भाजपने देशभर प्रचार केला.

आम आदमी पार्टीचे सरकार दिल्लीत सत्तारुढ झाल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विकास कामांचा क्रम सुरू केला. त्यामुळे दिल्लीच्या जनतेने त्यांना पुन्हा कौल दिला. दिल्लीतील विकास कामांचा प्रभाव शेजारी असलेल्या पंजाबवरही पडला. त्यामुळे यंदा पंजाबच्या जनतेनेही ‘आप’चा पर्याय निवडला. केजरीवाल यांनी दिल्लीत राबविलेल्या विकास मॉडेलची आता विदेशातही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गुजरातपेक्षा दिल्लीच्या विकास मॉडेलमध्ये काय वेगळे आहे याची उत्सुकता भाजपा लागली आहे.

पंजाबनंतर ‘आप’ महाराष्ट्रात आणि गुजरात विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. अशात आम आदमी पार्टी गुजरातमध्ये दिल्लीत मॉडेलचा व्यापक प्रचार करू शकते, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळे जोवार हे विकास मॉडेल नेमके काय आहे, हे कळत नही टॉवर त्यावर भाष्य करता येणार नाही असे गुजरात भाजपमधील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यासाठीच भाजप आपल्या नेत्यांना दिल्लीला पाठवत आहे.


गुजरात भाजपचे शिष्टमंडळ प्रदेश भाजप कार्यालयात पोहोचून येथील नेत्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर गुजरात भाजपचे शिष्टमंडळ नजफगडला जाईल, जिथे सर्वजण दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने बांधलेल्या शाळा, रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकची पाहणी करतील. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबत ट्विट करीत ‘आप’ भाजपच्या शिष्टमंडळाचे स्वागत करेल असे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर ‘आप’चे शिष्टमंडळही गुजरातला जाईल व तेथील विकासाची पाहणी करतील असे नमूद केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!