Akola : जुने शहर येथे 1974 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्री वीर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम, उपक्रम घेण्यात येतात. थोर व्यक्ती आणि क्रांतिकारकांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करण्यात येते. मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव वीर हनुमान चौक आणि शिवपेठ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन करून छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. आतंषबाजी करुन परिसरात मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी श्री वीर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जुने शहर भागातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.