Home » Lok Sabha Election 2024 : घरात नारीशक्तीची, देशाच्या दारात सैन्यशक्तीची काळजी घेणारे पंतप्रधान मोदीच

Lok Sabha Election 2024 : घरात नारीशक्तीची, देशाच्या दारात सैन्यशक्तीची काळजी घेणारे पंतप्रधान मोदीच

Anup Dhotre : बाळापूर तालुक्यातील आगर येथे उज्ज्वला गॅसचे वितरण

0 comment

Balapur : सर्वसामान्य माणसाच्या वेदनांची जाण आणि जगभरातील भारतीयांची ‘जान’ असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख ही त्यांच्या कार्यातून झाली आहे, असे प्रतिपादन अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख अनुप धोत्रे यांनी केले.

गोरगरीबांच्या प्रत्येक घरात उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शन पोहोचविण्याचे काम मोदी सरकारने केल्याचे ते म्हणाले. महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्ती मोदी सरकारने उज्ज्वला गॅस योजनेतून केली. त्यांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या त्यातून सुटल्या. शेतकरी, शेतमजूर, कामगार, सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला-पुरुष, विद्यार्थी, युवावर्ग यासर्वांना विविध लोककल्याणकारी योजना अमलात आणण्याची व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सरकारने केल्याचे धोत्रे म्हणाले.

सरकारच्या विविध योजना घराघरात पोहोचल्या आहेत. त्यामुळे गावखेडयातील चुलीतून निघणाऱ्या धुरापासून महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सुटल्या आहेत. घरात नारीशक्तीची व देशाच्या दारात सैन्यशक्तीला भेडसावत असलेल्या समस्या त्यांनी सोडविल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना आखण्यासोबत त्या प्रत्यक्ष राबविण्यासाठी काम केले आहे. हे काम फक्त समस्येची जाण असणारा संवेदनशील व्यक्तीच करू शकतो, अनुप धोत्रे यांनी सांगितले. आगर येथे आयोजित उज्ज्वला गॅस योजनेत 100 महिलांना गॅस कनेक्शन वितरणप्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपाध्यक्ष शंकर वाकोडे, तालुकाध्यक्ष देवेंद्र देवराव, राजेंद्र काळणे, गणेश लोड, संतोष शिवरकर, मनीराम टाले, किशोर खिळे, विपुल घोगरे, पकंज पळसपगार, अमरसिंग भोसले, बंडु काळणे, विष्णुपंत वारकरी, संतोष डिक्कर आदीसह बहुसंख्य नागरिक व महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष भिसे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदीप खोले यांनी केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!