Home » Supreme Court : दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही

Supreme Court : दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही

by admin
0 comment

New Delhi : राजस्थानमध्ये आता दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना सरकारी नोकरी करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारच्या 1989 मधील निर्णयाला आता मंजुरी प्रदान केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माजी सैनिक रामजी लाल जाट यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता अपत्यांचे बंधन सरकारी नोकरीसाठी पाळावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अनेक राज्यांमध्ये दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास निवडणूक लढविण्यावर बंदी आहे. अशात राजस्थानमध्ये नवीन कायदा करण्यात आल्याने त्याला विरोध होत होता. अशात सर्व विरोधावर आता सरकारने उच्च न्यायालयातील याचिकेत मोठे यश मिळविले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!