प्रसन्न जकाते
नागपूर : केंद्र सरकारच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित शहरे राबविण्याचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतलाय. त्यानुसार राज्यातील एकूण ५७ शहरांचा विकास करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
राज्यातील एकूण ९ महापालिका, ३० नगर परिषद, १८ नगर पंचायतींचा यात समावेश करण्यात आलाय. शहरांचे दरडोई उत्पन्न, पाणी पुरवठ्याची परिस्थिती, पक्क्या घरांची टक्केवारी, अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या आणि जीएफसी स्टार रँकिंग लक्षात घेता या ५७ गावांची निवड करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
‘ड’वर्ग महापालिका : अकोला, परभणी, लातूर, सोलापूर, मालेगाव (नाशिक), जळगांव, नांदेड वाघाळा, भिवंडी, उल्हासनगर.
‘ब’ वर्ग नगर परिषद : देगलूर, आर्वी, सेलू, वसमतनगर, गंगाखेड, माजलगांव, मनमाड, सिल्लोड, जिंतूर, पैठण, मूर्तिजापूर, नांदुरा.
‘क’ वर्ग नगर परिषद : औसा, किनवट, गडचांदूर, लोहा, नेर नबाबपूर, मुदखेड, मानवत, तळोदा, चांदूरबाजार, पातूर, बिलोली, नळदुर्ग, मुरुम, परतूर, मुखेड, इगतपुरी, कन्हान-पिंपरी, पाथरी.
नगरपंचायती : मानोरा, मालेगांव – जहॉगिर, अर्धापूर, सडक – अर्जुनी, माहूर, सिंदखेडा, मंठा, भातकुली, मोखाडा, पाली, नायगांव, अंगार, भामरागड, फुलंब्री, नशिराबाद, एटापल्ली, बार्शीटाकळी, पालम.