Home » अकोल्यात चार कोटींचा पूल पाण्याखाली

अकोल्यात चार कोटींचा पूल पाण्याखाली

by नवस्वराज
0 comment

अकोला : चार महिन्यांपूर्वी चार कोटी रुपये खर्चून तात्पुरता पूल बांधण्यात आला. त्याची उंची अवघी दोन मीटर असल्याने हा पूल पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्याने अकोट-अकोला मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प पडली आहे. अकोला-अकोट मार्गावरील गांधीग्रामचा ब्रिटीशकालीन पूल नादुरुस्त झाल्याने चार महिन्यांपूर्वी चार कोटी रुपये खर्चून तात्पुरता पूल बांधण्यात आला होता.

गांधीग्रामच्या ब्रिटिशकालीन पुलाला तडे गेल्याने १८ ऑक्टोबर २०२२ पासून त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. वाहतूक खोळंबू नये म्हणून नदीपात्रात तात्पुरत्या स्वरूपाचा दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. १२ मार्चला या पुलाचा लोकार्पण सोहळासुद्धा धडाक्यात झाला. त्यानंतर वाहनांची वर्दळ वाढली. मात्र जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्णा नदीच्या पात्रात वाढ झाल्याने हा अवघा दोन मीटर उंचीचा पूल पाण्याखाली गेला आहे. लोकार्पणानंतर अवघ्या ११० दिवसांतच या पुलावरून पाणी गेल्याने नियोजनातील फोलपणा उघड झाल्याचा आरोप होत आहे. गांधीग्रामचा पूल दरवर्षी पाण्याखाली जात असतानाही खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळे आता या मार्गावरील प्रवाशांना गोपालखेड मार्गे अकोटला जावे लागत आहे. या वाहनांना चक्क ४० किमीचा फेरा मारावा लागत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!